ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला गोपनीय संरक्षण माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील नौदल मुख्यालयात काम करणाऱ्या एका क्लर्कला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल यादव असे असून, तो हरियाणाचा रहिवासी आहे. तो दिल्लीतील नौदल मुख्यालयात क्लर्क म्हणून काम करतो. त्याच्यावर भारतीय नौदल आणि इतर संरक्षण संस्थांशी संबंधित संवेदनशील पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.












