4.3 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

इराणच्या आण्विक तळांवरून ४०० किलो युरेनियम गायब, गेलं कुठे? जगभरात चिंता!

इराण-इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थीनंतर आता युद्धसमाप्तीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेनं इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर इराणकडून त्यावर आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. कतारमधील अमेरिकेच्या तळावर हल्ले चढवण्यात आले होते. त्यामुळे युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलं. इराण व इस्रायलनं युद्धबंदीसाठी सहमती दर्शवण्यासाठी अमेरिकेनं इराणमधील तीन तळांवर केलेले हल्ले कारणीभूत झाल्याचा दावा ट्रम्प करत आहेत. पण आता यातून एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

४०० किलो युरेनियम गायब!

अमेरिकेनं इराणमधील फोर्डो, नतान्झ व इसफाहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. यात तिन्ही तळांचं मोठं नुकसान झालं असून इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. त्याचवेळी पेंटॅगॉनच्या डीआयएनं सादर केलेल्या अहवालात इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त झाले नसून त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे, हे तळ काही महिन्यांत पुन्हा कार्यरत होतील, असा अहवाल सादर केला आहे. पण एकीकडे हा संभ्रम चालू असतानाच या तळांवरून तब्बल ४०० किलो युरेनियम गायब झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे!

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला असून इराणनंच हे ४०० किलो युरोनियम अमेरिकेच्या हल्ल्यांच्या आधी दुसरीकडे हलवल्याचा दावा त्यांनी केला आहे. “येत्या काही आठवड्यांत आम्ही यासंदर्भात पावलं उचलू आणि त्या युरेनियमचं काय करायचं, याबाबत धोरण ठरवू. इराणशी युद्धासंदर्भातल्या चर्चेदरम्यान हे युरेनियम हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असेल”, असंही व्हान्स यांनी स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

गायब झालेलं युरेनियम चांगल्या दर्जाचं

कोणत्याही हत्यारासाठी युरेनियम वापरण्यासाठी ते आवश्यक घटकांनी किमान ६० टक्के समृद्ध असणं गरजेचं आहे. पण इराणच्या आण्विक तळांवरून गायब झालेलं युरेनियम हे तब्बल ९० टक्के समृद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या ते आहे तसं अणुबॉम्ब बनवण्यासाठी वापरता येणं अशक्य असलं, तरी इराणसाठी अमेरिकेशी चर्चेदरम्यान हे युरेनियम ही महत्त्वाची जमेची बाजू ठरू शकते.

कुठे गेलं ४०० किलो युरेनियम?

फोर्डो, इसफाहान व नतान्झ या तीन आण्विक तळांवरून इराणनं दुसरीकडे हलवलेल्या ४०० किलो युरेनियमच्या मदतीने जवळपास १० अणुबॉम्ब तयार करता येतील असा अंदाज आहे. त्यामुळे इराणमधील अणुबॉम्ब निर्मिती प्रक्रिया उद्ध्वस्त झाल्याचा आनंद एकीकडे ट्रम्प मानत असताना दुसरीकडे इराण या ४०० किलो युरेनियमच्या मदतीने दुसऱ्या आण्विक तळावर आपला अणुकार्यक्रम राबवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इराणनं हे युरेनियम इसफाहान येथील एका भूमिगत केंद्रावर हलवल्याचं सांगितलं जात आहे.

हल्ल्याआधी फोर्डो तळावर दिसली होती ट्रकची रांग!

दरम्यान, अमेरिकेनं इराणमधील आण्विक तळांवर हल्ला करण्याच्या आधी फोर्डो आण्विक तळाच्या बाहेर एकूण १६ ट्रकची रांग दिसून आली होती. यासंदर्भातले सॅटेलाईट फोटो व्हायरलही झाले होते. पण हल्ल्यांनंतर हे ट्रक अचानक गायब झाल्यामुळे त्यातूनच युरेनियम हलवण्यात आलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in