-0.1 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

५५ कोटींचे बजेट, कमावले तब्बल ४६० कोटी; प्राइम व्हिडीओवरील ‘हा’ ब्लॉकबस्टर विनोदी सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

अलिकडच्या काळात ‘जवान’, ‘पठाण’, ‘अॅनिमल’, ‘पुष्पा’, ‘जेलर’ असे चित्रपट सिनेमागृहांमध्ये दमदार कमाई करत आहेत. अॅक्शन चित्रपटांची जणू लोकांमध्ये क्रेझ आहे. विनोदी चित्रपटांना आता प्रेक्षकांची फार पसंती मिळताना दिसत नाही. पण काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता, ज्यात अजिबात अॅक्शन सीन नव्हते, तसेच तो मिस्ट्री-थ्रिलर नव्हता, तरी बॉक्स ऑफसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेल्या बॉलीवूड अभिनेत्याचा एक चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अभिनेत्याचं नाव आमिर खान (Aamir Khan). आणि आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्या चित्रपटाचं नाव ‘3 इडियट्स’. हा चित्रपट १६ वर्षांपूर्वी आला होता. यात आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन व करीना कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

आमिर खानने ‘सरफरोश’, ‘वाजी’, ‘तलाश’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सारखे अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट दिले आहेत. पण ‘३ इडियट्स’ अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट नव्हता. हा एक विनोदी चित्रपट होता. या चित्रपटातील काही दृश्यांचे व्हिडीओ आताही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतक्या वर्षांनंतरही आजही हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवतो.

‘३ इडियट्स’चे बजेट व कलेक्शन

3 Idiots Budget and Box Office Collection: ५५ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात ४६० कोटी रुपये कमावले होते. ‘३ इडियट्स’ला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग मिळाले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

‘३ इडियट्स’ चा तमिळ रिमेक

‘३ इडियट्स’ या गाजलेल्या बॉलीवूड चित्रपटाचा ४ वर्षानंतर तमिळमध्ये रिमेक बनवण्यात आला. विधू विनोद चोप्रा यांनी ‘३ इडियट्स’ चे अधिकार एस. शंकर यांना विकले. या चित्रपटात सूर्या मूख्य भूमिका साकारेल, अशी चर्चा होती. ‘३ इडियट्स’ चं तमिळमध्ये ‘नंबन’ नाव ठरवण्यात आलं.

या चित्रपटाचे बजेट ५० कोटी रुपये होते. यात आमिरची भूमिका थलपती विजयने केली होती. तर, करीनाने साकारलेल्या भूमिकेत इलियाना डिक्रुज होती. श्रीकांत व जीवा यांनी इतर महत्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. तर, सत्यराज यांनी व्हायरसचे पात्र साकारले होते. २०१२ मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले होते.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in