हिंगोली : समृद्ध शेती करण्यासाठी मातीपरीक्षण आवश्यक असून, त्याप्रमाणे पीक घेणे सोयीचे होईल. ऊस उत्पादनात वाढ करावयाची असल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा आवश्य वापर करावा. जगभरात एआयचे तंत्रज्ञान ऊस उत्पादन वाढीसाठी वापरले जात आहे, अशी माहिती बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे एआय विभाग प्रमुख तुषार जाधव यांनी केले.












