5.4 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

व्हॉट्स ॲप चॅटबॉटवरून मुंबईकरांना मिळणार शिव योग केंद्रांची माहिती

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईकरांसाठी योग केंद्राची माहिती उपलब्ध करणारी व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवा सुरू केली. या सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांनी ८९९९२२८९९९ या क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधल्यास नजीकच्या परिसरातील शिव योग केंद्रांबाबत अद्ययावत व सविस्तर माहिती मिळू शकेल. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रॅन्ट रोड येथील गोकुळदास तेजपाल सभागृहात आयोजित विशेष योगसत्रात सार्वजनिक आरोग्य खात्याचे उप आयुक्त शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, योगेश देसाई, शिल्पा शिव योग शाळेच्या शिल्पा चारणिया आदींच्या उपस्थितीत व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेचे लोकार्पण करण्यात आले. धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीरासाठी थोडा वेळ काढायला हवा. दररोज नित्यनेमाने योग करायला हवा, असे आवाहन उप आयुक्त शरद उघडे यांनी यावेळी केले.

असा करा व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर

चॅटबॉटद्वारे महानगरपालिकेच्या वतीने मुंबई

मुंबईमध्ये १०६ शिव योग केंद्र

मुंबई महापालिकेच्यावतीने १०६ शिव योग केंद्रांमार्फत सोमवार – बुधवार – शुक्रवार आणि मंगळवार – गुरुवार – शनिवार अशा सत्रांमध्ये योग सेवा प्रदान करण्यात येते. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग अशा सर्व घटकांसाठी ही सुविधा आहे. मुंबईतील सर्व प्रभागांममधील मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, उद्याने आणि सामुदायिक स्थळांवर सकाळी व सायंकाळी नियमित योग सत्रे घेण्यात येतात.

महानगरात संचालित शिव योग केंद्राची माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये योग सत्रांची वेळ, स्थळ आदी माहिती मराठी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईकरांना त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील शिव योग केंद्राची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मोबाइलमधील लोकेशन ऑन करून ८९९९२२८९९९ या क्रमांवर संदेश पाठविल्यास त्यांना विविध पर्याय उपलब्ध होतात. त्यातील ‘आरोग्य सेवा’ हा पर्याय निवडल्यानंतर पुढील संदेशात व्हॉट्स ॲप चॅटबॉटकडून ‘शिव योग केंद्र’असा पर्याय दिला जातो. त्यापुढे जावून, लोकेशन शेअर करून ’शिव योग केंद्र’ असा पर्याय निवडल्यास आपल्या नजीकच्या शिव योग केंद्रांची यादी, त्यांचा संपूर्ण पत्ता, तेथील योग शिक्षकाचे नाव आणि संपर्क क्रमांक उपलब्ध होते.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in