पुणे : मावळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती. आरोपी वाघमारे ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. याप्रकरणी वाघमारेविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्यचाार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.












