अलिबाग- रायगड जिल्ह्यात वर्षासहलीसाठी येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तूमच्यासाठी महत्वाची आहे. पावसाळी सहलीसाठी प्रसिध्द असलेल्या देवकुंड धबधबा आणि सिक्रेट पाँईंट या पर्यटन स्थळांवर पर्यटकासाठी प्रवेश बंदीचे आदेश माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी जारी केले आहेत. पुण्यातील कोंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाने हे प्रवेश बंदी आदेश जारी केले आहेत.












