इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आठवा दिवस आहे. यादरम्यान शुक्रवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायलने इराणच्या अणु पायाभूत सुविधांना लक्ष्य केले, तर तेहरानने इस्रायलवर ‘क्लस्टर म्युनिशन्स’ असलेली क्षेपणास्त्र डगली आहेत, ज्यामध्ये एका रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात या प्रकारचे शस्त्र पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष शिगेला पोहचला असून तो कमी होण्याची किंवा राजनैतिक मार्गाने तोडगा काढला जाण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.












