4.3 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

एमपीएससी मंत्र: गट क सेवा मुख्य परीक्षापेपर एक : विश्लेषण

मुख्य परीक्षा २०२४ ही सप्टेंबर २०२५ मध्ये प्रस्तावित आहे. नव्या पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून त्या आधारे पुढील तयारी करणे आवश्यक आहे. त्यानुसार पेपर एकचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू.

सन २०२२ च्या गट क सेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक हा संयुक्त आणि पेपर दोन हा पदनिहाय स्वतंत्र पेपर अशा पद्धतीचा पॅटर्न होता. तो २०२३ च्या मुख्य परीक्षेपासून बदललेला आहे. पदांसाठी पेपर एक हा भाषा पेपर आणि पेपर दोन हा सामान्य अध्ययन आणि बुद्धीमत्ता चाचणी अशा पॅटर्नची गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ ही डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आली. आता सहायक मोटार वाहन निरीक्षक वगळता गट क सेवेच्या इतर सहा पदांसाठी गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ ही सप्टेंबर २०२५ मध्ये प्रस्तावित आहे. नव्या पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून त्या आधारे पुढील तयारी करणे आवश्यक आहे. त्यानुसार पेपर एकचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू.

या पेपरमध्ये मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांसाठी ५०-५० गुण अशी विभागणी आहे. या पेपरसाठी २५ टक्के नकारात्मक गुणपद्धती लागू आहे. हे पहाता सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याचा अट्टाहास करुन चालणार नाही. ८५ ते ९०प्रश्न सोडविण्याचे उद्दीष्ट ठरवून पेपर सोडविणे व्यवहार्य ठरेल.

व्याकरणावरील प्रश्न

● दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्नांमध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण बरेच जास्त आहे.

● प्रत्येक प्रकारच्या नियमावर किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.

● दोन्ही भाषांमधील व्याकरणावरील प्रश्न हे उदाहरणे देऊन आणि प्रत्यक्ष दोन्ही पद्धतींनी विचारण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांची नेमकी माहिती असणे आणि त्यांचा वापर करता येणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

● इंग्रजी शब्द रचना, स्पेलिंग, शब्दांचे प्रकार, यावर सरळ व विश्लेषणात्मक अशा दोन्ही प्रकारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. रेन अँड मार्टिन किंवा कोणत्याही इंग्रजी व्याकरणाच्या प्रमाणित संदर्भ ग्रंथाचा वापर करावा.

● इंग्रजी वाक्यरचनेचे प्रकार व त्याचे नियम बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे. [प्रयोग, काळ आणि तुलनांचे स्तर]. या घटकाचा अभ्यास कसा करावा यासाठी सिव्हिल्स महाराष्ट्र – राज्य लोकसेवा आयोग परीक्षा माहिती कोश हे पुस्तक उपयोगी ठरेल.

● मराठीच्या प्रश्नंमध्ये व्याकरणाचे प्रत्यक्ष नियम विचारण्यापेक्षा नियमांचे उपयोजन करून उदाहरणे सोडविण्याच्या प्रश्नांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे अर्थ समजून घेऊन नियमांचा वापर करण्याचा सराव आवश्यक आहे. यासाठी के सागर प्रकाशनाचे डॉ. लीला गोविलकर यांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक वापरावे.

आकलनविषयक प्रश्न

● म्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्नांची तयारी जास्तीत जास्त सराव करूनच होऊ शकणार आहे.

● समानार्थी व विरू द्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी याबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी रोजचे इंग्रजी वाचन व त्याचे आकलन याचा सराव आवश्यक आहे.

शब्दांचे अर्थ आणि मूलभूत व्याकरण नियम यांची सांगड घालणारे प्रश्नही विश्लेषणात्मक प्रश्नांमध्ये समाविष्ट आहेत.

● दोन्ही भाषांमधील शब्दसंग्रह, वाक्प्रचार व म्हणी यांचा संग्रह वारंवार वाचत राहणे आणि शक्य असेल तर रोजच्या रोज ठरावीक वेळ अवांतर वाचन करणे हा या घटकाच्या तयारीचा गाभा आहे.

● दोन्ही भाषांमध्ये उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या आहे प्रत्येकी पाच. उताज्यावरील प्रश्नांचे विश्लेणातून लक्षात येते की उता-याचा विषय नीट लक्षात आला तर सगळेच प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात. त्यामूळे उतारा घाई न करता शांतपणे व समजून घेत वाचला तर प्रश्नांचे उत्तर नेमके कुठे शोधायचे ते लगेच लक्षात येईल. यासाठी दोन्ही उताऱ्यांना मिळून किमान १० ते १२ मिनिटे वापरली तर १० पैकी ८ गुण तर नक्कीच मिळवता येतील.

मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. किंबहुना प्रत्येक भाषेची शब्द योजना, वाक्यरचना इत्यादी बाबी इतरांपेक्षा वेगळ्याच असतात.

हा मुद्दा लक्षात घेऊन दोन्ही भाषांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पण समांतर अशी योजना करता आल्यास कमी वेळेत चांगली तयारी होते. भाषेचा अर्थ व व्याकरणाचे नियम समजून घेणे आणि त्यांच्या वापराचा सराव करणे ही या परीक्षेतील यशाचीच नाही तर भाषेवर मजबूत पकड निर्माण करायची गुरूकिल्ली आहे. या पेपरच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये पाहू

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in