नागपूर : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पळवापळवीच्या राजकारणावरून भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत चाललेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी शेठजींचे दिल्लीतील नोकर आणि नोकरांचे नोकर प्रयत्न करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील एका संवादाचा आधार घेत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान दिले. यावर आता विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज त्यांनी केलं.












