अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर यांची व्हाईट हाऊस येथे दुपारच्या जेवणाच्या वेळी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल संघर्षाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. गुरूवारी पाकिस्तानी लष्कराने एक निवेदन जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. “इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीवर देखील सविस्तर विचारांची देवाणघेवाण झाली, यावेळी दोन्ही नेत्यांनी हा संघर्ष थांबवण्याच्या महत्त्वावर भर दिला.”












