एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या बोइंग ७८७ या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. सदर अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. मात्र भीषण स्फोटात ब्लॅक बॉक्सला बरीच हानी पोहोचली आहे. अशात भारतात त्याच्यातील माहिती प्राप्त करणे कठीण होऊन बसले आहे. यासाठी आता हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठविला जाणार आहे.












