अभिनेत्री व रितेश देशमुखची पत्नी जिनिलीया देशमुख हिने २०११ मध्ये ‘फोर्स’ चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर जॉन अब्राहम होता. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तिचे आणि जॉन अब्राहमचे चुकून लग्न झाले होते, अशा चर्चा होत आहेत. आता जिनिलीयाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. सेटवर एका दृश्यादरम्यान दोघांचं खरंच लग्न झालं होतं. दोघांनी एकमेकांना हार घातले, तसेच खऱ्या पुजाऱ्याच्या उपस्थितीत सात फेरे घेतले होते, अशा अफवा पसरल्या होत्या.
आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने या अफवेबद्दल स्पष्टीकरण दिलं. “त्या अफवेत काहीही तथ्य नव्हते. आम्ही लग्न केलं नव्हते. या सगळ्या गोष्टी पीआरने पसरवल्या होत्या. मला वाटतं की तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे, की त्यांनी असं का केलं,” असं जिनीलीया म्हणाली. तसेच या सर्व गोष्टी निव्वळ अफवा असल्याचं तिने म्हटलं.












