RRB technician recruitment 2025: अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती सुरू आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) २०२५-२६ या कालावधीसाठी तंत्रज्ञ भरती मोहीम सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे, ज्यामध्ये संपूर्ण भारतात ६,१८० रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २८ जून २०२५ रोजी सुरू होईल आणि २८ जुलै २०२५ पर्यंत रात्री ११:५९ वाजता संपेल. इच्छुक उमेदवारांनी https://www.rrbapply.gov.in या अधिकृत भरती पोर्टलद्वारे त्यांचे अर्ज सादर करावेत.
या भरती उपक्रमाचे उद्दिष्ट भारतीय रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना बळकटी देणे आहे, ज्यामुळे विविध ट्रेडमध्ये रिक्त पदे भरली जातील. एकूण पदांपैकी १८० पदे, तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल पदांसाठी आहेत, तर उर्वरित ६,००० पदे तंत्रज्ञ ग्रेड ३ पदांसाठी आहेत. निवड प्रक्रियेत संगणक-आधारित चाचणी (CBT), त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी यांचा समावेश असेल.
पदानुसार विभागणी आणि पात्रता निकष












