अमिताभ बच्चन आणि आमिर खान दोघेही बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. आमिर गेल्या ३७ वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे, तर बिग बी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ५६ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे.
बिग बी यांनी संपूर्ण जगाला त्यांच्याबद्दल वेड लावले आहे आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच आमिर खानदेखील त्यांचा चाहता आहे. आमिर खान बिग बींचे चित्रपट पाहत मोठा झाला आहे आणि त्याने बिग बींकडून खूप काही शिकले आहे.
आमिर हा अमिताभ यांच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे यात काही शंका नाही. त्याने स्वतः हे अनेक वेळा सांगितले आहे. त्याला अमिताभ खूप आवडतात आणि तो त्यांचा खूप आदर करतो. पण, जेव्हा पहिल्यांदा अमिताभ यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा बिग बींसमोर आमिर खान काहीही बोलू शकला नाही आणि त्यांचा आवाज ऐकताच तो उभा राहिला.
अमिताभ बच्चन यांना आमिरशी बोलायचे होते
एकदा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोमध्ये त्याच्या मुलाबरोबर आलेल्या आमिर खानने त्याच्या बॉलीवूड कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक मनोरंजक किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता, “मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, मी ‘जो जीता वही सिकंदर’चे शूटिंग करत होतो, त्यावेळी सेल फोन नव्हते. संध्याकाळी शूटिंगवरून परत आलो तेव्हा रिसेप्शनमधून माझ्या फोनवर फोन आला आणि मला सांगण्यात आले की, जेव्हा तुम्ही तिथे नव्हता तेव्हा अमिताभ बच्चन यांचे तुम्हाला फोन आले होते. तर मी हसायला लागलो, कारण आम्ही कधीच बोललो नव्हतो.”
आमिर पुढे म्हणाला, “मी अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता होतो. आता मी विचार करत आहे की अमिताभ बच्चन मला माझ्या हॉटेल नंबरवर, उटी येथील खोली क्रमांकावर (जिथे आमिर त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता) का फोन करतील? मला वाटले कोणीतरी मस्करी करत आहे आणि मी ते गांभीर्याने घेतले नाही आणि अचानक फोन वाजला. मी फोन उचलला आणि रिसेप्शनमधून सांगितले की, अमिताभ बच्चनजींनी फोन केला आहे. मला अजूनही विश्वास बसत नव्हता आणि फोनवर सरांचा आवाज येताच हॅलो आमिर, मी बसलो होतो आणि उभा राहिलो. माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. अमितजींनी मला दोन-तीन गोष्टी सांगितल्या आणि मी फक्त हो सर म्हटले आणि बाकी काही नाही.”












