0.4 C
New York
Monday, January 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

विश्वासकुमार रमेश यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; साश्रू नयनांनी दिला भावाच्या पार्थिवाला खांदा

अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामधून २४२ प्रवाशांपैकी फक्त विश्वासकुमार रमेश हे एकमेव प्रवाशी जिवंत वाचू शकले. त्यांचे बंधू अजय रमेश यांचा अपघातात मृत्यू झाला होता. विश्वास आणि अजय हे लंडनला जात होते, मात्र दुर्दैवाने यात २४१ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. विश्वासकुमार यांच्या चेहऱ्यावर आणि डाव्या हाताला दुखापत झाली होती. नुकतेच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. तसेच त्यांचा भाऊ अजय रमेश यांचा मृतदेहही कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.

विश्वास कुमार यांनी आज साश्रू नयनांनी आपल्या भावाला अखेरचा निरोप दिला. दीव येथील आपल्या घरी आल्यानंतर नातेवाईकांसमोर त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया अपघातानंतर विश्वासकुमार जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती.

अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात १२ तारखेपासून विश्वासकुमार उपचार घेत होते. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, विश्वासकुमार केंद्रशासित प्रदेश दीव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबाला रुग्णालयाने सर्वतोपरी मदत दिली. तसेच एअर इंडियाने त्यांच्या कुटुंबाची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, मात्र नातेवाईकांनी ही मदत घेण्यास विरोध केला.

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात सीट क्र. ११जे वर विश्वास यांचे लहान बंधू अजय रमेश बसले होते. त्यांच्या मृतदेहाची डीएनए ओळख झाली आहे. बुधवारी पहाटे अजय यांचा मृतदेह रमेश कुटुंबाला देण्यात आला. तसेच विश्वासकुमार यांनाही डिस्चार्ज दिला गेला. त्यानंतर कुटुंबाने दीव येथे प्रस्थान केले.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडियाच्या एआय-१७१ विमानाचा अपघात झाला. विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीला विमान आदळले. या अपघातात विमानातील १० क्रू सदस्यांसह २३१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ज्याठिकाणी विमान कोसळले, तेथील ३४ लोकांचाही बळी गेला.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in