दीपिका पादुकोण व सलमान खान हे दोघे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांनीही आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. दोघांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, आजवर या दोघांनी कधीही एकत्र काम केलेलं नाही. ‘बिग बॉस’ दरम्यान एकदा सलमान खान व दीपिका पादुकोण एकत्र झळकले होते. यावेळी दीपिकाने सलमान खानला प्रपोज केलं होतं. दीपिकाने सलमान खानला प्रपोज केलं तो व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हारयल झाला होता. अशातच आता दोघांच्या या व्हिडीओबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.












