अमरावती : राज्यातील आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्याबाबत आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने कृतीदलाची (टास्क फोर्स) स्थापना जून २०२३ मध्ये केली होती, पण कृतीदलाची कार्यकक्षा वाढणार असल्यामुळे तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या कृतीदलास मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावयाचे असल्यामुळे या कृतीदलाची महिला व बालविकास विभागाकडून केलेली स्थापना रद्द करून ती सार्वजनिक आरोग्य विभागाने करावी, असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला. आता पुन्हा नव्याने माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. पण, हा द्रविडी प्राणायाम कशासाठी हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.












