इराण-इस्रायल यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून लष्करी संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर आक्रमक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी नवी दिल्लीत २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी एक आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.”
नियंत्रण कक्षाचे संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत:












