लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा हे दोघे एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा चर्चा अनेकदा होत असतात. दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. पण, या दोघांनी अनेकदा ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असल्याचं सांगितलं आहे. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान रश्मिका विजयबद्दल बोलताना लाजताना दिसली. यामुळे आता पुन्हा या जोडीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.












