नागपूर: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच ज्योतिष्यपीठ आणि द्वारकापीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती यांनी नागपूरमध्ये मोठे विधान केले आहे. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्याची पुन्हा एकदा चर्चा रंगणार आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादावरही मोठे विधान केले.












