सहा महिन्यांपूर्वी एक मुलगी बेपत्ता झाली होती, तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तरुणीच्या प्रियकराला अटक केली. ही घटना कर्नाटकातल्या गदगमधली आहे. पोलिसांनी या तरुणीच्या २८ वर्षीय बॉयफ्रेंडला अटक केली.
पोलिसांनी काय सांगितलं?
कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश हिरेमठ नावाच्या इसमाने त्याची प्रेयसी मधुश्री अंगडीची हत्या केली. ही घटना सहा महिन्यांपूर्वीची आहे. सतीशने मधुश्रीची हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला. सतीश आणि मधुश्री यांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १६ डिसेंबर २०२४ ला मधुश्रीने घर सोडलं त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. ती बाहेर गेली आहे असं सांगण्यात आली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार १२ जानेवारी २०२५ ला दाखल करण्यात आली कारण ती सापडतच नव्हती. यानंतर पोलिसांनी तिचा बराच शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना तपासात समजलं की सतीश हिरेमठ बरोबर मधुश्री गेली होती. त्याच रात्री ती गायब झाली. सुरुवातीला पोलिसांना सतीशवर संशय आला नाही. पण त्याचं मोबाइल लोकेशन तपासल्यानंतर पोलिसांना संशय आला होता. दरम्यान सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला होता.












