महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती महापालिका निवडणुकांची आणि त्या अनुषंगाने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची. राज ठाकरेंच्या ‘टाळी’ला उद्धव ठाकरेंनी हाळी दिली. ज्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी ताज लँड्स एंड या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे युतीसाठी सकारात्मक आहेत. दरम्यान याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मदारी असं म्हटलं आहे.












