Shivsena Split २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या साथ घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याची बाब एकनाथ शिंदेंना खटकली होती. अडीच वर्षांनी शिवसेना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. आता भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरे होत्या असा दावा केला आहे.












