गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये तब्बल २७५ जणांचा बळी गेला. या घटनेत विमानातील पायलट आणि क्रू सदस्यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याची कारणं आता शोधण्यात येत आहेत. यासाठी तपास यंत्रणा तपास करत असून अपघाताची कारणं शोधण्यात येणार आहेत.
या घटनेनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यातच योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मात्र, या विमान दुर्घटनेबाबत बोलताना रामदेव बाबा यांनी वेगळाच संशय व्यक्त केला होता. या दुर्घटनेमागे परकीय शक्ती असू शकतात असं म्हणत त्यांनी तुर्कीयेकडे बोट दाखवलं होतं. दरम्यान, यानंतर आता तुर्कीयेची प्रतिक्रिया समोर आली असून तुर्कीयेने हा दावा फेटाळून लावला आहे.












