4.7 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

नीट प्रवेशाचा कट ऑफ घसरणार…

मुंबई : मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलच नव्हे, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा कट ऑफ चांगलाच घसरणार आहे. यंदा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना फारच अवघड गेला होता. त्यामुळे निकाल घसरल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गतवर्षी नीट परीक्षेसाठी २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा २२ लाख ७६ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामुळे यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल दोन लाखाहून अधिक घट झाली. यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ६५ हजार ९९० विद्यार्थ्यांनी, तर १२ लाख ७१ हजार ८९६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी पात्र मुलांची संख्या ५ लाख १४ हजार ६३ एवढी असून, मुलींची संख्या ७ लाख २२ हजार ४६२ एवढी आहे.

नीट परीक्षेत यंदा एकूण १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. नीट परीक्षेत ६८६ ते ६५१ पर्यंत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ७३ आहे. तर ६०१ ते ६५० दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी १२५९ एवढेच आहेत. त्याचप्रमाणे ५५१ ते ६०० च्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ६५८ एवढी आहे. ५०२ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारापर्यंत आहे. त्यामुळे यंदा नीट परीक्षेचा कट घसणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

भाषेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

नीट परीक्षेसाठी स्थानिक भाषा घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय घट झाली आहे. गतवर्षी मराठी भाषा घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ७५९ इतकी होती, तर यंदा ९२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मराठी भाषा निवडली होती. त्याचबरोबर गतवर्षी १ हजार ६५ कन्नड विद्यार्थी होते, तर यंदा अवघे ४६० विद्यार्थ्यांनी कन्नडमधून परीक्षा दिली. तसेच उर्दूमधून गतवर्षी १ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा ही संख्या ९४३ इतकी आहे. गतवर्षी परीक्षेमध्ये १ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी ओडिसा भाषा निवडली होती. मात्र यंदा अवघ्या ८१२ विद्यार्थ्यांनी ओडिसा भाषा निवडली होती. सर्वात कमी पंजाबी भाषेची निवड करण्यात आली आहे. १७० विद्यार्थ्यांनी पंजाबी भाषा परीक्षेसाठी निवडली होती.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in