अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता उत्तराखंड येथे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हेलिकॉप्टर अपघात होऊन सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. हेलिकॉप्टर पायलटसह सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी ही घटना काय घडली?
उत्तराखंडचे एडीजी डॉ. व्ही मुरुगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने निघालं होतं. आर्यन अॅव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायणच्या दरम्यान खाली कोसळलं. दाट धुकं आणि कमी दृश्यता यामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटने नियंत्रण गमावलं असण्याची शक्यता आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहितीही मुरुगेशन यांनी दिली. मागील दोन महिन्यांतली ही चौथी घटना आहे.












