इराण आणि इस्रायलमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावाने आता युद्धाचे रूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. या परिस्थितीत इराणने आपल्या सैन्यात मोठा बदल केला आहे. इराणचे कमांडर इन चीफ अयातुल्ला अली खामेनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये माजी संरक्षण मंत्री जनरल अमीर हतामी यांची इराणी सैन्याचे नवे प्रमुख कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इराणच्या राजधानीत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात देशाच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांची हत्या झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मेजर जनरल सय्यद अब्दुलरहीम मौसावी यांना सशस्त्र दलांचे प्रमुख बनवण्यात आले आहे.
कोण आहेत अमीर हतामी?
हुसेन देहघान यांच्या जागी ५९ वर्षीय अमीर हतामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१३ ते २०२१ पर्यंत इराणचे संरक्षण मंत्री होते. आता वाढत्या प्रादेशिक तणावादरम्यान त्यांनी देशाच्या नियमित लष्करी दलांचे नेतृत्व स्वीकारले आहे. हतामी यांनी इमाम अली ऑफिसर्स अकादमी, एजेए युनिव्हर्सिटी ऑफ कमांड अँड स्टाफ आणि नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांनी हतामी यांच्या समर्पणाची, क्षमता आणि अनुभवाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, हतामी यांच्या नेतृत्वाखाली सैन्यात परिवर्तनकारी आणि क्रांतिकारी बदल होतील. याशिवाय इस्रायली हल्ल्यात सशस्त्र दलांचे माजी प्रमुख (CSAF) जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांच्या मृत्यूनंतर खामेनी यांनी मेजर जनरल सय्यद अब्दुलरहीम मौसावी यांची सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. आदेशात खामेनी यांनी म्हटले आहे की, “लेफ्टनंट जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांच्या निधनानंतर मेजर जनरल सय्यद अब्दुलरहीम मौसावी यांच्या प्रशंसनीय सेवा आणि अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.”
मोहम्मद पाकपूर यांची आयआरजीसी चे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती
इस्रायली हल्ल्यात लेफ्टनंट जनरल हुसेन सलामी यांच्या मृत्यूनंतर, मेजर जनरल मोहम्मद पाकपूर यांची आयआरजीसीच्या कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. खामेनी म्हणाले की, “मेजर जनरल मोहम्मद पाकपूर यांच्या प्रशंसनीय सेवा आणि मौल्यवान अनुभवामुळे त्यांना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.
इराण-इस्त्रायल संघर्ष:
- इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू, आण्विक तळही उद्ध्वस्त
- इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे
- इराणच्या अयातुल्ला खामेनींचा इस्रायलला इशारा
- इस्रायल-इराण संघर्षात आतापर्यंत ८१ बळी
- संयुक्त राष्ट्राचं दोन्ही देशांना आवाहन
- इराणला मोठी किंमत मोजावी लागेल – इस्रायलचे संरक्षण मंत्री
- इस्रायलने सात महिन्यांपूर्वीच आखलेली योजना
- इस्रायलच्या हल्ल्यात पाच इराणी अधिकारी व सहा अणू शास्त्रज्ञांचा मृत्यू, देशभरात ७८ बळी
अली शादमनी पीबीयूएचचे कमांडर
लेफ्टनंट जनरल घोलामाली रशीद यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली खामेनी यांनी मेजर जनरल अली शादमनी यांची खातम अल-अंबिया (PBUH) केंद्रीय मुख्यालयाचे कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.
या अधिकाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू
आण्विक स्थळांवर हल्ले
शुक्रवारी इस्रायलने इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ला केला. इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रे इस्रायल आणि जगासाठी धोका निर्माण करतात. प्रत्युत्तरादाखल, इराणने तेल अवीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले.












