रिसोड येथे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन व उष्मालाट कार्यक्रम प्रशिक्षण संपन्न
वाशिम,दि.१३ मार्च (जिमाका) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम आणि तहसील कार्यालय रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयातील सभागृहात १३ मार्च रोजी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन व उष्मालाट कार्यक्रमाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी, त्यावरील उपाययोजना तसेच पूर, वीज, आग, भूकंप, भूस्खलन, रस्ते अपघात, सर्पदंश, उष्मलाट आणि जलतरण या विषयांवर एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार गजानन जवादे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार तुळशीराम कुळमेथे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी नायब तहसीलदार तुळशीराम कुळमेथे यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.
प्रशिक्षणाचे मार्गदर्शक दीपक सदाफळे (जीवरक्षक) यांनी पूर, आग, प्रथमोपचार, रस्ते अपघात, वीज, सर्पदंश, आपत्ती व्यवस्थापन आणि शोध व बचाव या विषयांवर मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके सादर केली. पर्यावरण व जलसंधारण या विषयावर पवन मिश्रा, सर्पदंश या विषयावर प्रा. राजाभाऊ गोरे, एस.टी. अपघात या विषयावर वाहतूक निरीक्षक आ. प्र. काळे, तर बालविवाह अभियान या विषयावर यु. रु. अ. वाशिमचे समन्वयक सुनील इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुका स्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसीलदार तुळशीराम कुळमेथे, अनंता रोकडे (स. म. अ. रिसोड), सुधाकर पडघान (सा. म. अ.), आशिष सावंगेकर (ग्रामीण महसूल सहाय्यक, रिसोड) यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन धनंजय काष्टे (ग्रामीण महसूल सहाय्यक) यांनी केले.
याशिवाय, सरपंच, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलिस कर्मचारी, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक/सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल, रोजगार सेवक, उमेद अभियान व्यवस्थापक, रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिसोड तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या सर्च अँड रेस्क्यू टीमचे अंकुश सदाफळे, शेखर केवट, अतुल उमाळे, अश्विन केवट, शुभम भोपळे, विष्णु केवट यांनी पुढाकार घेतला.