23.1 C
New York
Friday, May 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

जलतारा योजना पाणीटंचाईवर प्रभावी उपाय दहा आठवड्यात दहा लक्ष जणतारा उभारण्याचे निर्धार : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

जलतारा योजना पाणीटंचाईवर प्रभावी उपाय

दहा आठवड्यात दहा लक्ष जणतारा उभारण्याचे निर्धार : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस 
वाशिम, दि. १३ मार्च (जिल्हा माहिती कार्यालय) – वाशिम जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलतारा योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पुढील १० आठवड्यात १० लाख जलतारा तयार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी मौजे जनुना सोनवळ (ता. वाशिम) येथे भेट देऊन ग्रामस्थांना योजनेची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जलतारा उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच अग्रीस्टॅक योजनेतही सर्वांनी फार्मर आयडीची नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.यावेळी जलतारा खोदणीच्या उपक्रमाचा शुभारंभ पूजन व श्रमदान करून करण्यात आला.
जलतारा योजनेंमुळे भूजल पातळी वाढून पाण्याची टिकाऊ उपलब्धता राहणार आहे. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, पावसाचे पाणी साठवता येईल आणि पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे.
याप्रसंगी तहसीलदार वाशीम निलेश पळसकर , तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे , ग्राम महसूल अधिकारी श्री गावंडे श्री सडके महसूल मंडळ अधिकारी पांडुरंग मापारी , कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी आणि पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष नानवटे पोलीस पाटील संतोष चौधरी उपस्थित होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन या गावाचे रहिवासी असलेले प्रशासनातील ग्राम महसूल अधिकारी व्ही जी राठोड तसेच गावकरी मंडळी यांनी स्वयंफुर्तीने यांनी केले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रशासनाच्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जलतारा खोदणीसाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही.
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.