संजीवनी परिवाराच्या वर्धापन दिनी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न…
वाशिम / प्रतिनिधी :
सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या संजीवनी सेवाभावी परिवाराच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे NEWS 18 लोकमत चे जिल्हा प्रतिनिधी किशोर गोमाशे यांना स्व डॉ जगदीश बिडवई संजीवनी दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला
यावेळी सत्कार मूर्ती कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आमदार श्वेताताई महाले यांनी प्रगती,समृध्दी कडे जाताना संवेदनशीलता कमी होत आहे,ती संवेदनशीलता टिकविण्याचे काम संजीवनी परिवाराच्या माध्यमातून होत आहे याचा मला अभिमान आहे,असे मत व्यक्त केले,
डोणगांव येथील राजुरकर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंतबाप्पु बिडवई तर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष राजेंद्र आखाडे, परतवाडा पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के,भाजपा तालुकाध्यक्ष अँड शिव ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष सपकाळ,सौ वंदना आखाडे, डॉ अनुपमा झोरे,राजेंद्र पळसकर, सिध्देश्वर पवार यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन आयोजकांच्या वतीने अतिथीचां भव्यदिव्य स्वागत समारंभ संपन्न झाला, प्रास्ताविक मनोगतातून संजीवनी परिवाराचे अध्यक्ष डॉ गजानन उल्हामाले यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्या मागील भूमिका स्पष्ट केली,
याप्रसंगी आमदार श्वेताताई महाले यांना स्व चतुराबाई सदाशिवराव पळसकर स्मृती प्रित्यर्थ राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून सन्मानित तर स्व माधवराव उल्हामाले स्मृति प्रित्यर्थ परतवाडा पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के, डॉ अनुपमा झोरे ,स्व रमेश माधव सावजी स्मृती कृषी भुषण प्रगतशील शेतकरी शिवशंकर पळसकर, संतोष बोन्द्रे,स्व डॉ जगदिश बिडवई स्मृती संजीवनी दर्पण पुरस्कार ने संतोष मलोसे, संतोष राऊत, प्रल्हाद भिसे, किशोर गोमाशे, मयुर गोलेच्छा,
स्व वामनआप्पा फिसके,स्व उत्तमराव खंडारे गुरजी स्मृती विविध सांस्कृतिक क्षेत्रातील गणेश डव्हळे, अनिकेत तेलभाते,सौ संगीता चव्हाण,शाहिन पटेल, नगरसेवक तौफिक कुरेशी,संजय अजगर, प्रथमेश संदीप पांडव,कु वैष्णवी सातपुते,कु हर्षदा घिरके,कू प्रिया रविंद्र बोंडगे सह गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले,
आ श्वेताताई महाले, सह पो नि सुरेश म्हस्के, डॉ अनुपमा झोरे, सिध्देश्वर पवार,शाहिन पटेल, किशोर गोमाशे यांनी आपल्या मनोगतातुन पुरस्कार, सत्कार , पाठीवर पडलेली शाबासकीची थाप ही आपण सामाजिक कार्याची पावती असून प्रेरणा व उर्जा देण्याचे , समाजाप्रती जवाबदारी वाढविण्याचे काम करते, अश्या भावना यावेळी व्यक्त केल्यात,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी,प्रा गजानन सातपुते, डॉ नकूल फुले तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले, यशस्वीतेसाठी दिपक आखाडे, डॉ शिवाजीराव बाजड, अनिल आवटी,बबनराव पळसकर, विनोद खंडारे, सुरेन्द्र सिंह चव्हाण, सुरेश फिसके,आसीफ खान,किरण देवकर, गणेश पळसकर, हितेश सदावर्ते, बंकुसेठ सारडा, सुभाष अढाव,कु अनम खान आदिनी अथक परिश्रम घेतले,












