16.3 C
New York
Tuesday, May 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

शहरातील विस्कळीत व अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे महिला आक्रमक; हंडा मोर्चाचा इशारा

शहरातील विस्कळीत व अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे महिला आक्रमक; हंडा मोर्चाचा इशारा
भिमसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. माया वाठोरे यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांचे निवेदन
वाशिम – एकबुर्जी धरणात पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा असतांना सुद्धा शहरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरीकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे सोमवार, २७ जानेवारी रोजी भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. माया रमेश वाठोरे यांच्या नेतृत्वात व असंख्य महिलांच्या उपस्थितीत नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आला. तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात पुरेसा व नियमित पाणीपुरवठा न झाल्यास नगर परिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदनात नमूद आहे की,  वाशिम शहरातील सर्व प्रभागात गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरीकांना ८ ते १० दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरीकांना योग्य प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरीकांना टँकर किंवा कॅनचे पैसे मोजून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पाणी ही नागरीकांची मुलभूत गरज असून आवश्यक बाब आहे. पाणीपुरवठा नियमित होत नसल्यामुळे येथील गोरगरीबांना पैसे मोजून पिण्याचे पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे. या बाबीची दखल घेवून शहरातील प्रत्येक भागात दर दोन दिवसाआड पिण्याचे पाण्याचा पुरवठा होण्याबाबत कार्यवाही व्हावी. अन्यथा भिमसंग्राम संघटनेच्या वतीने नगर परिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना मनिषा वानखडे, कल्पना घुगे, लक्ष्मी इंगळे, संगीता गायकवाड, लक्ष्मी पट्टेबहादुर, रेखा ठोके, शोभा खंडारे, सुमन खंडारे, राधा खडसे, जयश्री खिल्लारे, लक्ष्मी खडसे, संगीता आठवले, कादंबरी पट्टेबहादुर, कांचन कांबळे, कस्तुरा भालेराव, वेणू वाहुळे, विद्या रोकडे, दिक्षा वैद्य, पुजा चंद्रशेखर आदी महिलांची उपस्थिती होती.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.