वाशिम पोलीसांच्या कौतूकाचे चौफेर वारे; चोरट्यांना २४ तासाच्या आत दाखविले खाकीचे ‘तारे’
१ कोटी १५ लाखाच्या जबरी चोरी प्रकरणी मुद्देेमालासह दोन सख्खे भाऊ जेरबंद
वाशिम – नविन वर्षात एकीकडे जिल्हयात एकापाठोपाठ होणार्या जबरी चोर्या आणि घरफोडी प्रकरणामुळे जिल्हावासी धास्तावले असतांना काल दि. ९ जानवेारी रोजी सायंकाळी हिंगोली उड्डाणपुलावर झालेल्या तब्बल १ कोटी १५ लाखाच्या जबरी चोरी प्रकरणातुन चोरट्यांनी एकप्रकारे वाशिम पोलिसांना आव्हान दिले होते. तसेच यामुळे वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र संपुर्ण वाशिम जिल्हयाला हादरवणार्या या चोरी प्रकरणात पोलीस दलाच्या संपुर्ण यंत्रणेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत २४ तासाच्या आत रोख रकमेसह सख्खे भाऊ असलेले विजय गोटे व संजय गोटे रा. तोंडगाव या चोरट्यांना जेरबंंद केले. त्यामुुळे वाशिम पोलीसांच्या कौतूकाचे चौफेर वारे; चोरट्यांना २४ तासाच्या आत दाखविले खाकीचे ‘तारे’ असे या प्रकरणात म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.
या प्रकरणातील तपासाची संपुर्ण माहिती देण्यासाठी जिपोअ अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात शुृक्रवार, १० जानेवारी रोजी सायंकाळी जिपोअ कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधिक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण महल्ले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, पोलीस निरिक्षक प्रदीप परदेसी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.
या घटनेतील अधिक माहिती अशी की, हिंगोली मार्गावर असलेल्या बाहेती मार्केट मध्ये काम करणारे विश्वासातील विठ्ठल हजारे यांना एचडीएफसी बँक वाशिम येथील चेक देवुन १ करोड रुपये बँक मधुन व १५ लाख रुपये मित्राकडुन आणण्यास सांगीतले. त्याप्रमाणे विठठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस हे १ कोटी १५ लाख रुपये घेवुन स्कुटीने बाहेती मार्केट हिंगोली रोड येथे घेवुन जात असता उड्डान पुलावर मागुन अज्ञात दोन इसम मोटार सायकलवर येवुन विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांना रॉड व हत्याराने मारहान करुन विठ्ठल हजारेकडील १ कोटी १५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावुन मोटार सायकलने पळुन गेले.
या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना मिळताच अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा असे सर्व अधिकारी सर्व स्टाफसह तात्काळ घटनास्थळ गाठुन व देवळे हॉस्पीटल वाशिम येथे उपचार घेत असलेले विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांचेकडुन गुन्हयाची माहिती घेतली. दि.०९.०१.२०२५ रोजी चे १७.५५ वाजता दरम्याण विनाविलंब तपासाकरीता वेगवेगळया टिम तयार करुन सर्व प्रथम वाशिम शहरातील घटनेच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळवुन आरोपींची माहिती घेतली. विशेष पोलीस महानिरीक्षक, रामनाथ पोकळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ जिल्हा अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशिम येथे बोलावुन घेतले. वाशिम जिल्हा पोलीस आणि अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा असे अनेक पथक तयार करून गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला. मिळालेल्या माहिती व सीसीटीव्ही फुटेज वरुन रात्रभर सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.
त्यानंतर गुन्हयातील आरोपींचे शोध कामी घटनाक्रम लावुन तांत्रीक तपासावर भर देवुन तपासातील टिम वेगवेगळया ठिकाणी रवाना करुन जिल्हयाचे आजुबाजुचे सर्व लहान-मोठी शहरातील हॉटेल, लॉजेस, बार व संशयीत ठिकाणे चेक करण्यात आली. जेथे मिळतील त्या त्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे काम सतत चालुच होते. १४.४० वा. चे दरम्याण सीसीटीव्ही फुटेज घेत असता घटना घडल्यापासुन ते आतापर्यंतच्या तपासातील मिळालेल्या माहिती वरुन सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारे दोन ईसम हेच गुन्हयातील आरोपी असल्याची खात्री झाली. त्यातील एक व्यक्ती हा विजय गोटे हा असुन तोंडगाव येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपासाची चक्रे फिरवुन त्यास विनाविलंब ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली व ईतर आरोपींची नावे दिल्याने गुन्हा उघडकीस आणला. गुन्हयातील दुसरा आरोपी संजय गोटे (रा तोंडगांव ) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल १ कोटी ०२ लाख रुपये जप्त करण्यात आले.
सदर गुन्हयाचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे अमरावती परिक्षेत्र अमरावती, अनुज तारे पोलीस अधिक्षक वाशिम, श्रीमती लता फड अपर पोलीस अधिश्वक वाशिम, सहायक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात पोनि स्थागुशा रामकृष्ण महल्ले, पोनि प्रदिप परदेसी, पोनि देवेंद्रसिंह ठाकुर व इतर सपोनि पोउपनि व अंमलदार यांनी केला. पोलीसांनी रात्रंदिवस न थांबता अथक परिश्रम घेतले. तांत्रीक तपासामुळेच गुन्हा उघडकीस आला आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवर सुध्दा दखल घेण्यात आली आहे.
तपास पथकाला ७० हजाराचे बक्षीस
वाशिम शहरात काल घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातील पोलीस दल यांच्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करणे अतिशय महत्त्वाचे होते. म्हणूनच या गंभीर घटनेची अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी दखल घेऊन तपासाची पूर्ण यंत्रणा काटेकोरपणे कामाला लावली. अमरावती परिक्षेत्रातील सर्व पथकांनी मिळून उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल पोलीस महासंचालक रामनाथ पोकळे यांनी ७० हजाराचे बक्षीस घोषित केले आहे
वाशिम पोलीसांच्या कौतूकाचे चौफेर वारे; चोरट्यांना २४ तासाच्या आत दाखविले खाकीचे ‘तारे’
आमच्याबद्दल
भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)
संपर्क
Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE
SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505
CELL.9765332897
hellowashim.in