हिंगोली – भारतभरातील सहयोगी डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्यरत अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी येथील डॉ. मिरा दत्ता पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी गुरुवार, ९ जानेवारी रोजी पाटेकर यांना निवडीचे पत्र दिले. डॉ. मिरा पाटेकर यांचे हिंगोली जिल्हयाच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यांच्या वैद्यकीय कार्यायाची दखल घेवून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकार्यांनी सहयोगी डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्यरत रहावे. यासोबतच अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनने स्थापनेपासूनच देशभरातील डॉक्टरांच्या अधिकारासाठी मोठा लढा उभारून डॉक्टरांच्या पाठशी ठामपणे उभी राहीली आहे. अनेक अन्यायग्रस्त डॉक्टरांसाठी असोसिएशनने न्यायालयात कायदेशीर लढा देवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे नवनियुक्त पदाधिकार्यांनी एकजुटीने व एकदिलाने ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय सेवा करणार्या सहयोगी डॉक्टरांच्या हक्क अधिकारासाठी संघटनात्मक कार्य करावे असे आवाहन डॉ. हिवाळे यांनी केले.
आमच्याबद्दल
भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)
संपर्क
Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE
SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505
CELL.9765332897
hellowashim.in