19.5 C
New York
Thursday, May 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

परभणी येथील संविधान प्रतिकात्मक प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना वाशीम मध्ये आदरांजली.

परभणी येथील संविधान प्रतिकात्मक प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना वाशीम मध्ये आदरांजली.
वाशीम(प्रतिनिधी)परभणी येथे दि.१० डीसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची पवार नावाच्या समाज कंटकाने तोडफोड करून विटंबना केली होती.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शांततेच्या मार्गाने आंदोलन केली गेली.आणि होत आहेत.या आंदोलनामध्ये कशाचाही संबंध नसणाऱ्यांना कोंबींग ऑपरेशन च्या नावाने धरपकड करून चाकण येथे राहत असलेल्या व परभणी येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी भीमसैनिक एल.एल.बी.च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला आला असता पोलीस प्रशासनाने कोबींग ऑपरेशन करून या भीमसैनिकास अटक केली.व बेदम मारहाण केली.त्यामुळे या सोमनाथ सुर्यवंशी भीमसैनिकाचा तुरूंगातच मृत्यू झाला.म्हणून वाशीम येथे संपूर्ण संविधान प्रेमी व समाज बांधवांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा व महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करून भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.प्रसंगी पिरीपाचे महाराष्ट्र प्रदेश नेते गोपाळराव आटोटे, सुप्रसिद्ध ह्रदय रोगतज्ञ डॉ.सिद्धार्थ देवळे, डॉ.माधव हिवाळे,पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, विधीज्ञ मोहन गवई, जेष्ठ कवी अनिल कांबळे, महेंद्र ताजणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान, सम्राट टाइम्स चे संपादक विनोद तायडे,यश कंकाळ, समाजकार्य पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादूर, मा.सरपंच विनोद पट्टेबहादूर,भगवान ढोले,डिंगाबर खिल्लारे, शेतकरी युवा नेते अरूण शेळके पाटील, सहदेव चंद्र शेखर,संतोष सरकटे,आकाश खडसे, विक्की सावंत,विरपीन इंगोले यांचे सह अनेकांनी शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी गोपाळराव आटोटे गुरूजी यांनी आदरांजली वाहताना मनोगत व्यक्त केले की,परभणी येथील पोलीस प्रशासनाने भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना ठार केले असून त्यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यास नोकरी मधून बडतर्फ केले पाहिजे.कारण याच पोलिस अधिकारी यांचे काळात भीमा कोरेगाव येथील प्रकरण, नांदेड येथील अक्षय भालेराव प्रकरण घडले आहे.म्हणून याला शासनाने दलीतांवर अन्याय करण्यासाठीच नियुक्त केले आहे का असा प्रश्न निर्माण होतो. प्रसंगी डॉ सिद्धार्थ देवळे, दौलतराव हिवराळे,यांनी देखील आदरांजली पर मनोगत व्यक्त केले.या आदरांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पडघान यांनी केले. नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शासनाचा देखील तीव्र निषेध करून भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे,अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.