प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना
५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार मोफत
लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
वाशिम दि.१३ डिसेंबर (जिमाका) केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात १ एप्रिल २०२० पासून राबविली जात आहे.या योजनेचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे. गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आढावा सभेचे आयोजन केले होते त्यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. या आढाव सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी एस ठोंबरे यांच्यासह विविध यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या योजनेमध्ये १ हजार ३५६ गंभीर आजारांवर ५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात.हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब,प्रति वर्ष ५ लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळत असते.
“प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये
जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, वाशिम,७ शासकीय रुग्णालय व २० खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 11 लक्ष ५३ लक्ष ९५७ लाभार्थी पात्र आहेत .आजपर्यंत या योजनेमधून जिल्ह्यात 5,143 रुग्णांवर 6,685 उपचार शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार झाला असून उपचारार्थ 21 कोटी 89 हजार लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयातील 3 हजार 264 रुग्णांवर 3,651 उपचार व शस्त्रक्रिया झाली असून 10 कोटी 20 लक्ष रूपये खर्च शासनामार्फत करण्यात आला आहे
१ सप्टेंबर २०२३ पासून “आयुष्मान भव ” या मोहिमेअंतर्गत- आयुष्मान आपल्यादारी ३.० उपक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थीना त्यांचे आयुष्मान कार्ड्स शासनाकडून केवायसीद्वारे तयार करून दिले जात आहे.हे कार्ड तयार करण्याकरीता आशा सेविका,ग्रामपंचायत केंद्र चालक,सेतू सुविधा केंद्र,आरोग्य यंत्रणा आणि अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र लाभार्थीच्या आधार कार्डसच्या साहाय्याने आयुष्मान कार्ड तयार करून देत आहे.याकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण यांचेकडून एक मोबाईल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.
Web Portal:
https://beneficiary.nha.gov.in,
Mobile Application:
https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp
या लिंकद्वारे अप्लिकेशन डाउनलोड करून लाभार्थी बेनेफिशरी पर्याय निवडून स्वतःचे कार्ड स्वतः तयार शकतात.जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेमध्ये सर्व ग्रामपंचायत,सर्व आरोग्य केंद्रे आणि शहरी भागात वॉर्डनिहाय कार्ड काढण्याचे शिबिरे आयोजित केली आहेत,आतापर्यंत ५ लक्ष ३ हजार २०२ पात्र लाभार्थीना कार्ड्स देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थींनी आपले कार्ड त्वरित काढून घेणे गरजेचे आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सभेदरम्यान माहितीचे सादरीकरण डॉ.रणजीत सरनाईक यांनी केले.