13 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

समृद्धी महामार्गावर पुन्हा एक्सप्रेस ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होता होता टळला ?

समृद्धी महामार्गावर पुन्हा एक्सप्रेस ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होता होता टळला ?

बुलढाणा सचिन खंडारे

चंद्रपूरवरून पुणेच्या दिशेने जात असलेली ट्रॅव्हल्स चालकाला झोपेची ढोलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला धडकून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स अपघाताची पुनरावृत्ती होण्यापासून प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना दि ८ डिसेंबर च्या मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान चैनल नंबर ३२१ जवळ पोलीस स्टेशन किनगावराजा हद्दीत घडली.
याबाबत सविस्तर असे की, चंद्रपूर वरून पुणेकडे जात असलेली ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३४ बिझेड ८६७७ चे चालक नदीम खान वय २५ वर्षे रा.पळशी, जिल्हा यवतमाळ याला झोपेची डुलकी लागल्याने सदर ट्रॅव्हल्स समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकली. यामध्ये किन्नर साईडचे ट्रॅव्हल्स चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दैव बलवत्तर म्हणून यामध्ये मोठा अपघात घडला नाही. सदर अपघात झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवून ट्रॅव्हल्स तात्काळ नियंत्रणात आणली व सर्व ३० प्रवास्यांचे प्राण वाचवले. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ महामार्ग ॲम्बुलन्सचे डॉ.वैभव बोराडे, डॉ.यासीन शहा व चालक दिगंबर शिंदे यांनी जखमी नामे अमोल लोढे वय २५ वर्षे, रोशन ठाकूर वय ३० वर्षे, विनायक दोडके वय ४६ वर्षे, विना दोडके वय ४२वर्षे व चालक नदीम शहा या पाच जणांवर जागेवरच प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील औषधोपचारासाठी जालना येथे ॲम्बुलन्स द्वारे रवाना केले.
तसेच महामार्ग पोलीसचे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस कर्मचारी प्रवीण पोळ, गणेश उबाळे व एमएसएफ चे जवान गायकवाड व स्टॉफ यांनी महामार्गाने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सला थांबवून सदर इतर प्रवासी यांना पुढील प्रवास करिता रवाना केले. तसेच क्यूआरव्ही वाहनाचे हनुमंत जायभाये, कन्हैया काळे, प्रदीप श्रीरामे,दिगंबर इंगोले , आदित्य गोपाळे यांनी सर्वांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स क्रेनच्या मदतीने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच पुढील कारवाई पोलीस स्टेशन किनगावराजा करीत आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.