१५ वर्षीय मुलीला फुस लावून पळून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल .
बुलढाणा सचिन खंडारे
6 डिसेंबरला साखरखेर्डा येथील पंधरा वर्षीय मुलीला फुस लावून
पळून नेल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‘
सविस्तर वृत्तांत असा की पिडित मुलीचे वडील साखरखेर्डा येथील मच्छी मार्केटमध्ये मजुरी काम करत होते . काम करत असताना त्यांच्या पिडित मुलीच्या आईने त्यांच्या पतीला फोन करून घरी बोलावले ‘ त्यानंतर पिडित मुलीचे वडील घरी गेले असता पीडित मुलीचे आजीने सर्व हकीकत सांगितले ‘ कि मुलगीला गावातील पंचवीस वर्षे तरुणाने चार चाकी वाहने मध्ये बसून पळून घेऊन गेला आहे ‘ पिडित मुलीचा आजूबाजूला शोध घेतला असता मुलगी कुठेही आढळून आले नाही ‘सदर मुलीचे वर्णन उंची पाच फुट ‘ रंग गोरा अंगामध्ये मेहंदी रंगाचा पंजाबी सूट ‘ केस लांब चेहरा लांबट अशी आहे ‘ पीडित मुलगी ही पंधरा वर्षे १६ दिवसाची असून गावातीलच एका तरुणाने पुस लावून पळून नेली असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे ‘ त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५०/ २०२४ – १३७ (२ ) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे , पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड करत आहे ‘












