अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
वाशिम :- शहरातील अधिकारी कर्मचारी यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पॅंथर द रियल हिरो अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सहदेव उत्तमराव चंद्रशेखर यांनी म्हटले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला अधिकारी कर्मचारी हा केवळ आणि केवळ शिक्षण आरक्षण आणि भारतीय संविधान मुळेच घडू शकतो कर्मचाऱ्यांना पेन्शन कामाचा तास प्रसुती रजा विविध प्रकारच्या रजा अशा विविध प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना मदत केली कर्मचाऱ्यांच्या विविध परीक्षेंचा अधिकार देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आरक्षण व न्याय हक्कासाठी भारतीय संविधान सर्वांसाठी उपलब्ध करून दिले.बाबासाहेबांना याची पूर्ण जाणीव होती की जो शिकेल तोच स्पर्धेमध्ये टिकेल.शिक्षणापासून दूर असलेला व्यक्ती हा रुढी,प्रथा,परंपरा व अंधश्रद्धेला चिटकून राहतो तसेच त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची देखील त्याला जाणीव होत नाही त्यामुळे भारतीय संविधानाचा पूर्णपणे अभ्यास करण्याकरिता अनुकूल वातावरण निर्माण करणे हीच खऱ्या अर्थाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असणार आहे असे पेंटर द रियल हिरो अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सहदेव उत्तमराव चंद्रशेखर म्हणाले.यावेळी वाशिम शहरातील तमाम अधिकारी कर्मचारी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता उपस्थित होते












