16.1 C
New York
Sunday, June 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रिसोड येथे महामानवांना अभिवादन

रिसोड – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वााण दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रिसोड येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले, आरोग्य सहाय्यक डॉ. एस. यु. चंद्रशेखर, विस्तार आरोग्य अधिकारी जे.बी. उमाळे, लेखाधिकारी विजय नाईकवाडे, कनिष्ठ सहाय्यक जी.आर. धांडे, किटकशास्त्रज्ञ ममता कुटे, नागरी आरोग्य विशेषज्ञ डॉ. माधव हिवाळे, सिकलसेल सहाय्यक भारत पारवे, कुष्ठरोग सहाय्यक निलेश राठोड, संगणक चालक राहुल बाजड यांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण केले. त्यानंतर सर्वांनी अभिवादन केले. आपल्या मनोगतातून डॉ. रामहरी बेले यांनी महामानवांच्या कार्याची माहिती दिली. जगात सर्वश्रेष्ठ असे भारतीय संविधान लिहून बाबासाहेबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत. तसेच युगानुयुगे गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. त्यांचे विचार आजही समाजाला व संपुर्ण जगाला प्रेरणादायी असून आज इतर देशही बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारावर चालून आपल्या देशाचा विकास करीत आहेत. त्यामुळे समस्त भारतीयांनी त्यांच्या विचारावर चालून आपले जीवन सुकर करावे असे आवाहन डॉ. रामहरी बेले यांनी केले. डॉ. माधव हिवाळे यांनी आपल्या मनोगतातून युवा पिढीने बाबासाहेबांच्या विचारावर चालून आपल्या परिवाराच्या, समाजाच्या व देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार राहुल बाजड यांनी मानले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.