बुलढाणा / सचिन खंडारे
दि ३ डिसेंबर रोजी मंगळवार ला रात्री ९ वाजता बिबी – दुसरबीड रस्त्यावरील इंडियन ऑयल पेट्रोल पंपाच्या बाजूला ट्रक व रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये रुग्णवाहिका चालक अक्षय उकंडा आडे रा (आईचा तांडा) किनगाव जट्टू ता लोणार जि बुलढाणा जागीच ठार झाला आहे. सदर रुग्णवाहिका ही बिबी येथून दुसरबीड कडे जात होती तसेच रुग्णवाहिका वाहक राजेश्वर वाकळे वय वर्ष ३० रा वाशी मुंबई हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील सर्व नागरिक बिबी ग्रामीण रुग्णालयाचे १०८ चे कर्मचारी डॉ देवानंद फड रुग्णवाहिका चालक राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत केली त्यानंतर जखमी वाकळे यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सर्व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व वाहतूक सुरळीत केली पुढील तपासणी बिबी पोलीस स्टेशन करीत आहे ।