5.2 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

रस्त्यावर विना परवानगी गतीरोधक टाकुन महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न ! पतीचा आरोप : डोक्याला जबर मार लागल्यामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडले

रस्त्यावर विना परवानगी गतीरोधक टाकुन महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न !
पतीचा आरोप : डोक्याला जबर मार लागल्यामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडले
उंडाळ ले-आऊट मधील घटना : पोलीस स्टेशनला तक्रार
वाशिम – विना परवानगी व नियमाविरुध्द गतीरोधक रस्त्यावर टाकल्यामुळे स्कुटीवरुन उसळून महिला जबर जखमी झाल्याची घटना सोमवार, २५ नोव्हेंंबर रोजी स्थानिक केंद्रीय शाळेमागील उंडाळ ले-आऊट मध्ये घडली. अपघात घडला त्यावेळेस महिला उसळून सिमेंट रस्त्यावर पडल्यामुळे महिलेच्या मेंदुला मार लागल्यामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सिटी स्कॅनमध्ये निदान झाले. त्यामुळे विनापरवानगी व नियमाविरुध्द गतीरोधक रस्त्यावर टाकून माझ्या पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महिलेचे पती अंबादास सिताराम कांबळे यांनी २९ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीत केला आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, अंबादास कांबळे हे उंडाळ ले-आऊटमध्ये धिरेंद्र देवास यांच्या घरात पत्नी, मुलगा व मुलीसह भाड्याने राहतात. त्यांच्या घराला लागुनच सिमेंटचा रस्ता आहे. या रस्त्यावर कुणीतरी नुकतेच विनापरवानगी व नियमाविरुध्द गतीरोधक बांधले होते. त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता अंबादास कांबळे हे पत्नीसह स्कुटीवर बाहेरुन घरी जात असतांना रात्रीच्या अंधारात गतीरोधक दिसले नसल्यामुळे त्यांची स्कुटी अचानक गतीरोधकावरुन उसळली व त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी सौ. उज्वला कांबळे ही स्कुटीवरुन जोरात खाली पडली. व तिच्या डोक्याला व अंगाला जबर मार लागला. या अपघातात सौ. उज्वला ही जागीच बेशुद्ध पडली होती. अंबादास कांबळे यांनी पत्नीला लगेच डॉ. सागर दागडीया यांच्या हॉस्पीटला नेले असता डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यावरुन कांबळे यांनी वाशिम सिटी स्कॅन सेंटरमध्ये पत्नीचे सिटी स्कॅन केले. या अहवालात सौ. उज्वलाच्या मेंदुवर सुजन आल्याचे निदान झाले. अपघात झाल्यानंतर सौ. उज्वला ही वेड्यासारखी बडबड करत होती. तीच्या पुढील उपचार सुरु आहे. मात्र कुणीतरी रस्त्यावर विनापरवानगी व अतिउंच गतीरोधक टाकून माझ्या पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंबादास कांबळे यांनी केला असून या प्रकरणी तपास करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीव्दारे कांबळे यांनी केली आहे.
या प्रकरणी तक्रार देण्यासाठी अंबादास कांबळे हे शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले असता अशा प्रकारची तक्रार आपण घेवून शकत नसल्याचे सांगुन पोलीसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यामुळे आपण पोस्टाने पोलीस स्टेशनला तक्रार पाठविल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. तक्रारीच्या प्रती जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व न.प. मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in