बुलढाणा /सचिन खंडारे देऊळगाव राजा शहरा पासून हाकेच्या अंतरावरील चिरेबंदी येथील ट्रॅक्टर चालक-मालक युवकाचा पांगरी शिवारात घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पांगरी येथील घराच्या बांधकामावर मुरूम टाकत असताना ३ डिसेंबर रोजी सदर अपघात घडला.याबाबत प्राप्त माहितीनुसार कृष्णा भगवान खांडेभराड वय २४ वर्ष राहणार चिरेबंदी हे स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होते. मंगळवार ३ डिसेंबर रोजी पांगरी येथील काशिनाथ वाघ यांच्या घराच्या बांधकामावर ट्रॅक्टर द्वारे मुरूम टाकत असताना कृष्णा खांडेभराड हा फालक्याचे हुक खोलण्यासाठी खाली उतरला असता घडलेल्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.दरम्यान ग्रामस्थांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. मृतक कृष्णा हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. रात्री उशिरा चिरेबंदी येथे त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर अपघात प्रकरणी वृत्तलिहेपर्यंत पोलिसांत मर्ग नोंदविण्यात आला नव्हता. कृष्णा खांडेभराड यांच्या अपघाती मृत्यू ने समाजमन हेलावले आहे.
आमच्याबद्दल
भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि० वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)
संपर्क
Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE
SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505
CELL.9765332897
hellowashim.in












