18.4 C
New York
Wednesday, May 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रा.डॉ.शुभांगी दामले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशिम येथे कार्यरत संचालक,शारीरिक शिक्षण प्रा.डॉ.शुभांगी दामले

प्रा.डॉ.शुभांगी दामले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशिम येथे कार्यरत संचालक,शारीरिक शिक्षण प्रा.डॉ.शुभांगी दामले यांना भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (पेफि) यांनी त्यांच्या सातव्या पेफि राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत “बेस्ट योगा टीचर ” (सर्वश्रेष्ठ योगा शिक्षक) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी गत 28 वर्षे योगाची निरंतर केलेली सेवा, मागील दहा वर्षापासून मोफत योगाचे वर्ग चालवीत असल्याबद्दल आणि त्यांनी योगाचे राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पेपर पब्लिश केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच बरोबर त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदान उल्लेखनीय आहे. विविध सामाजिक संघटनेच्या त्या सक्रिय सदस्या असून त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
त्यांना दिनांक 24 नंबर 2024 रोजी दिल्ली येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन चे माननीय प्रोफेसर ब्रिज किशोर प्रसाद, केंद्रीय खेळ व युवा मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. कुणाल, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित हॉकी कोच श्री. ए. के. बंसल तथा क्रीडा क्षेत्रातील नामवंत डॉक्टर ए. के. उप्पल व मा. पियूष जैन यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
भारत सरकारच्या फिट इंडिया, खेलो इंडिया या योजनांनी खेळाडूंसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दालाने उघडली असून त्याचा लाभ असंख्य खेळाडू घेत आहेत. त्यांच्या या यशात शारीरिक शिक्षकांचा मोलाचा वाटा असून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हा उदात्त हेतू पूर्ण करण्याच्या हेतूने पेफिने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. या सोहळ्यात देशभरातून एकूण 27 शारीरिक शिक्षक व दोन संस्थांना हा बहुमान त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ योगदानाबद्दल देण्यात आला.
यात डॉक्टर जी. पी. गौतम लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने दिल्लीचे धनंजय शाॅ यांना सन्मानित करण्यात आले. सर्वश्रेष्ठ शारीरिक शिक्षक हा बहुमान भारताच्या पाच व्ही विभागातून देण्यात आला. मध्य भारतातून मध्यप्रदेशचे आशुतोष शर्मा व प्रोफेसर डॉक्टर ब्रिज किशोर प्रसाद, उत्तर भारतातून दिल्लीच्या आशा दलाल, सुनीता राणी, रोहित कुमार व प्रवीण कुमार, दक्षिण भारतामधून केरळचे अनु डी. अलप्पट व कर्नाटकचे डॉक्टर श्रीनिवास जी. एम. पश्चिम भारतातून महाराष्ट्राचे डॉक्टर राजेंद्र कुमार सुखदेव देवकते तर पूर्व भारतातून पश्चिम बंगालचे साहीनुर खान व अमलेंदू बागा यांना हा बहुमान प्राप्त झाला. सर्वश्रेष्ठ योगा शिक्षक पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रा.डॉ. शुभांगी भिवाजी दामले व मध्यप्रदेशच्या अल्का रहोरा यांना गौरविण्यात आले.
ग्रामीण क्षेत्रातील शारीरिक शिक्षा व फिटनेस व खेळ यांच्या प्रचाराच्या दृष्टीने भरीव काम करणारे पश्चिम बंगालचे डॉक्टर केशव चंद्र गोपे यांना डॉक्टर जयश्री आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याच प्रमाणे डॉक्टर एम रॉबसन युवा शोधकर्ता पुरस्काराने आसामचे पोली बोरा महाराष्ट्राच्या दिलप्रीत कौर व तामिळनाडूचे संजय कुमार एस. व डॉक्टर अजमेरसिंह सर्वश्रेष्ठ कोच पुरस्काराने पश्चिम बंगालच्या डॉक्टर नीतू दत्ता, उत्तर प्रदेशचे अशोक कुमार, दिल्लीचे ईश्वर भाटी व कुलदीप सिंह तसेच सर्वश्रेष्ठ अधिकारी/ जज/ रेफरी /अंपायर पुरस्काराने दिल्लीचे रोहित कुमार व उत्तरप्रदेशचे इंद्रनील घोष यांना सन्मानित करण्यात आले. शारीरिक शिक्षा व खेळातील नेतृत्व व उत्कृष्टते साठी दिल्लीचे डॉक्टर आणि देव सिंह व तेलंगणाचे थॉमस एम. ए. यांना कोमल व व्ही. के. पहुजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तरप्रदेशचे पराग अग्रवाल यांना डॉक्टर राकेश गुप्ता सर्वश्रेष्ठ कोच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील धर्म समाज सीनियर स्कूल व केरळच्या अझंशन कॉलेज ऑटोनॉमस या संस्थांना शारीरिक शिक्षा व खेळाना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था म्हणून डॉक्टर पी एम जोसेफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in

हॅलो वाशीम या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास वाशीम न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही.