गेल्या काही दिवासांपासून सायबर फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. गुन्हेगार लोकांनी फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. यादरम्यान पाकिस्तानी फोन नंबरवरून सततचे फोन कॉल, मॉर्फ केलेले नग्न फोटो तुमच्या संपर्कातील लोकांना पाठवण्याची धमकी अशा वेगवेगळ्या प्रकारे सायबर गुन्हेगारांकडून असंख्य लोकांना लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या माध्यामातून कर्ज घेणाऱ्या वापरकर्त्यांना सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
तक्रारदार देणाऱ्या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून वैयक्तिक कर्ज देण्याबाबत एक मेसेज पाठवण्यात आला होता. या काळातच तक्रारदाराला पैशांची गरज असल्याने त्याने ५,००० रुपयांचे कर्ज घेतले
या प्रकरणातील आरोपी इसाकी राजन थेवर असून हा २९ वर्षीय व्यक्ती मुंबईचा रहिवासी आहे आणि तो मूळचा तामिळनाडूचा आहे .












