प्रसिद्ध कन्नड युट्यूबर समीर एमडीवर याच्यावरोधात व्हिडीओच्या माध्यमातून खोटी महिती फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका माजी सफाई कर्मचार्याने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराच्या पीडितांचे मृतदेह गुप्तपणे कर्नाटकच्या धर्मस्थळ येथे दफन करण्यात आल्याचा दावा केला होता. या संबंधित व्हिडीओ बनवून खोटी माहिती पसरवल्याचा आरोप या युट्यूबरवर ठेवण्यात आला आहे.
‘धर्मस्थळाचे सिरीयल केलर कोण आहेत? (Who Are Serial K!llrs of Dharmasthala?)’ असे शीर्षक असलेला हा व्हिडीओ २३ मिनिट आणि ५२ सेकंदांचा होता आणि याला शनिवारी अपलोड केल्यापासून युट्यूबवर याला ३.१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.












