मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्कपासून मंत्रालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाला परवानगी नाकारल्याने आता फेरीवाल्यांनी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलै रोजी आझाद मैदानावर मुंबईतील फेरीवाले आंदोलन करणार आहेत. तसेच, पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे.












