संजय कपूर व महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शनायाचा पहिला चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शनायाबरोबर विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे. चाहत्यांना या प्रेमकथेकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण झालेल्या नाहीत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. ‘आंखों की गुस्ताखियां’ने एकाही दिवशी एक कोटी रुपये कमावलेले नाहीत, त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘आंखों की गुस्ताखियां’ने तिसऱ्या दिवशी ४१ लाखांची कमाई केली आहे. या सिनेमाचे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन १.२ कोटी झाले आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० लाख आणि दुसऱ्या दिवशी ४९ लाख रुपये कमावले. वीकेंडला चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये पुढच्या वीकेंडपर्यंत राहिल की नाही याबद्दल शंका आहे.












