आधुनिक तंत्रज्ञान वापरून, सफाई कामगारांना बरोबर घेऊन आधुनिक प्रणाली प्रत्येक शहरांमध्ये आणली गेली पाहिजे. आधुनिक प्रणाली वापरुन स्वच्छता करण्याचा मान देखील रत्नागिरी नगरपालिकेने पहिला घ्यावा, असे ही त्यांनी सांगितले. ३६५ दिवस रत्नागिरी शहर स्वच्छ असले पाहिजे. पर्यटकांमध्ये विलक्षण अशी वाढ झालेली आहे. याचा फायदा देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांना होत आहे. मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने शहराचे सादरीकरण जगासमोर करणं गरजेचं असल्याचे सामंत यांनी सांगितले.