यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी होणे हे अनेक इच्छुकांसाठी एक स्वप्न असते. काही जण हे स्वप्न पूर्ण करण्यासठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी आयआयटीमधून पदवी प्राप्त केली. लंडनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. पण, नंतर यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी ती नोकरी सोडली आणि आता ते एक आयपीएस अधिकारी आहेत.
@dnaindia ने दिलेल्या वृत्तानुसार या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आशीष तिवारी असे आहे. आयपीएस आशीष तिवारी सध्या उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे एसएसपी म्हणून कार्यरत आहेत. आशीष यांनी लंडन आणि जपानमधील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून आयपीएस होण्याचा निर्णय घेतला होता. आशीष २०१२ च्या बॅचच्या यूपी कॅडरचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक ३३० मिळवली आणि ते भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) सामील झाले. पुढच्या प्रयत्नात त्यांनी अजून जास्त मेहनत घेतली आणि २०१२ मध्ये ऑल इंडिया रँक मिळून २१९ सह ते आयपीएस अधिकारी झाले. आशीष यांना यूपी कॅडर (आयपीएस-आरआर २०१२) देण्यात आले आहे.












